Monday, May 26, 2008

आभास

तुला मी ज्या ज्या वेळी पाहतो .. त्या वेळी मला सौंदर्याची नवीन व्याख्या उमजते ... नवीन संदर्भ लागतात ... एका नावीण्याचा आभास निर्माण होतो ... आणि सर्व गोष्टी तुझ्यामधे सामावून जातात ... 

Friday, May 23, 2008

चाहत और ज़रूरत

ये तो बस चाहत और ज़रूरत का खेल है ... अगर वो मेरी Cast  की ना हो तोये मेरी ज़रूरत है की मैं Inter Cast Marriage  को Support  करूऔर अगर वो मेरी Cast की है तो , ये मेरी चाह है के मैं Inter Cast Marriage को Support  करू | |

Wednesday, May 21, 2008

सत्य

सत्य कठोर असत म्हणून ते नाकारयाच नसत...
सत्य स्वीकारल्याने जळ्मट दूर होतात .. तीही ढोन गिपणाची ... जो आपण स्वत:सोबत करत आलोत वर्षानुवर्ष...

सोबत

काही गोष्टी असतात ज्यामध्ये तुम्ही फक्त सोबत देऊ शकता ... त्याशिवाय अजुन काही जास्त देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आणि तुमची सोबत दोन्हीही अडचणीत सापडता ...

Monday, May 19, 2008

गुपित

अजुन ती म्हणजे गुपित आहे ...
एकदा का हो आले .. मग ती म्हणजे मिरवण्याच सत्य आहे ...

ती म्हणजे

ती म्हणजे सत्य आणि स्वप्न यामधे असणारी एक छोटीशी रेघ !
फक्त अजुन प्राप्य नाही म्हणून नाहीतर ... ती म्हणजे बायको ...

शांतता

शांततेचा भंग करणे माणसाला त्यावेळी शक्य होत नाही ज्यावेळी समोरचा
व्यक्ती स्वसमजुतिने गप्प बसला असेल .
अश्या वेळी डोळ्यात डोळे घालून बोलणे शक्य असेल तरच उत्तरची अपेक्षा करावी ..

संवाद

समोरच्या कडून संवादाची अपेक्षा असेल आणि नुसते हुंकार येणार असतील तर
शांत राहणे बरे असते !

मैत्री

कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.

वेळ

आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. किल्लीच घड्याळ गेल Electronic च आल. वेगवेगळी घड्याळ वापरायची की संपल..

जाळ!!!

जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

प्रॉब्लेम्स

प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.

आपत्ती

"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस
लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन
पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"

सौदर्य

नाविण्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते.
दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली, तर सगुण
साकारापलीकडचं सौदर्य दिसू लागतयं, अनुभवायला मिळतयं अस समजावं.

निर्णय

निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की बुध्दीवर ?बुध्दीच नसेल
तर ३ तास दिले तरी पेपर कसा सोडवणार ?

स्पर्श

नजर आणि स्पर्श, प्रेमाची ही भावना इतकी सर्व श्रेष्ट भावना आहे की नुसते
शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच
प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.
 
hit counter code download page
html hit counter code